जळीतकांडातील शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 01:29 IST2022-05-07T01:28:41+5:302022-05-07T01:29:16+5:30
येवला तालुक्यातील कुसुर येथे शेतीच्या वादातून झालेल्या जळीतकांडातील शेतकऱ्याचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळीतकांडातील शेतकऱ्याचा मृत्यू
येवला : तालुक्यातील कुसुर येथे शेतीच्या वादातून झालेल्या जळीतकांडातील शेतकऱ्याचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील कुसुर येथे शेतीच्या वादातून शेतकरी दिलीप शेषराव गायकवाड यांना संशयित संग्राम मेंगळ, राहुल हिंगे यांनी अंगावर डिझेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली होती. यात गायकवाड गंभीर भाजल्याने त्यांना येवला उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. अधिक उपचारार्थ नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या दिलीप शेषराव गायकवाड यांचा शुक्रवारी (दि. ६) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.