देशमाने येथील शेतकऱ्याचा चारीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:33 IST2021-02-08T01:32:16+5:302021-02-08T01:33:19+5:30
पाटपाणी भरताना चारीत पडून येथील तरुण शेतकरी राजेंद्र शिवाजी जगताप (३५ ) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

देशमाने येथील शेतकऱ्याचा चारीत पडून मृत्यू
देशमाने : पाटपाणी भरताना चारीत पडून येथील तरुण शेतकरी राजेंद्र शिवाजी जगताप (३५ ) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र जगताप हे शनिवारी (दि. ६) सायंकाळी ५.३० वा. सुमारास पालखेड डाव्या कालव्याच्या वितरिका क्र. २८ चे पाणी शेतात भरत होते. पाणी वाढविण्यासाठी गेले असताना ते चारीत पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. येवला तालुका पोलीस स्टेशनला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला असून, पोलीस हवालदार मधुकर उंबरे हे अधिक तपास करीत आहेत.