भरदिवसा घरात घुसून महिलेचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:23 IST2019-05-29T01:22:53+5:302019-05-29T01:23:10+5:30

चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या तीन तरुणांनी भर दुपारी घरात घुसून महिलेला बेशुद्ध करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना जेलरोड येथे घडली.

The family looted ornaments and looted the jewelery | भरदिवसा घरात घुसून महिलेचे दागिने लुटले

भरदिवसा घरात घुसून महिलेचे दागिने लुटले

नाशिकरोड : चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या तीन तरुणांनी भर दुपारी घरात घुसून महिलेला बेशुद्ध करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना जेलरोड येथे घडली.
जेलरोड दामोधरनगर माधव पार्कमध्ये उमेश अभिमन्यू धोंगडे, त्यांची पत्नी वैशाली व मुले राहतात. मंगळवारी दुपारी उमेश हे जेवण करून आपल्या रूममध्ये आराम करण्यास निघून गेले, तर वैशाली या खोलीचे कुलूप उघडून दुसºया खोलीत आल्या. दरम्यान २० ते २५ वयोगटातील तीन युवक चेहºयाला रुमाल बांधून खोलीमध्ये घुसले. त्यांनी वैशाली यांच्या तोंडाला रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर चोरट्यांनी वैशाली यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, कानातील पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा असा एकूण ७५ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेत पलायन केले. वैशाली यांच्या मुलीने सदर प्रकार बघितल्यानंतर लागलीच वडील उमेश यांना सांगितले. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले.

Web Title: The family looted ornaments and looted the jewelery