कपूर कुटुंबीयांची दिली बाळ येशू चर्चला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:12 IST2019-04-22T01:11:04+5:302019-04-22T01:12:14+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका करिना कपूर तसेच बहीण अभिनेत्री करिष्मा कपूर या आपल्या मातोश्री बबिता कपूर यांच्या समवेत नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू प्रार्थना मंदिरात शनिवारी दर्शनासाठी आल्या होत्या.

 The family of the camphor visited the baby Jesus church | कपूर कुटुंबीयांची दिली बाळ येशू चर्चला भेट

कपूर कुटुंबीयांची दिली बाळ येशू चर्चला भेट

नाशिकरोड : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका करिना कपूर तसेच बहीण अभिनेत्री करिष्मा कपूर या आपल्या मातोश्री बबिता कपूर यांच्या समवेत नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू प्रार्थना मंदिरात शनिवारी दर्शनासाठी आल्या होत्या.
चित्रपटसृष्टीतील जुन्याकाळच्या आघाडीच्या नायिका बबिता कपूर तसेच बॉलीवुड अभिनेत्री करिना व करिष्मा कपूर या नातेवाइकांसमवेत बाल येशू मंदिरात आल्या होत्या. करीनाचा मुलगा तैमूरदेखील सोबत होता. बाळ येशू मंदिरात त्यांनी दर्शन घेत पाहणी केली. यावेळी फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी आशीर्वाद दिले. सुमारे तासभर देवालयात दर्शनासाठी उपस्थित असलेल्या अभिनेत्री आल्याची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दर्शन आटोपून दुपारी सर्व मंडळी मुंबईकडे रवाना झाल्या.

Web Title:  The family of the camphor visited the baby Jesus church