देवळाली गावात टोळक्याकडून  कुटुंबाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 01:07 IST2021-05-29T01:06:31+5:302021-05-29T01:07:18+5:30

देवळालीगाव वडारवाडी येथे युवकाच्या हातातील पैसे हिसकावून त्याच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. 

Family beaten by mob in Deolali village | देवळाली गावात टोळक्याकडून  कुटुंबाला मारहाण

देवळाली गावात टोळक्याकडून  कुटुंबाला मारहाण

नाशिकरोड : देवळालीगाव वडारवाडी येथे युवकाच्या हातातील पैसे हिसकावून त्याच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. 
वडारवाडी येथील मनोज सतीश सकट याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काम आटोपून रस्त्याने पायी घरी जात असताना  कुस्ती मैदानाजवळ अर्जुन ऊर्फ गुड्डू रुंजा पवार, राहुल चंदू पवार (दोघे, रा. वडारवाडी) यांनी मनोजला अडवून त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मनोजने घरी जाऊन कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वडारवाडी चौकात उभ्या असलेल्या अर्जुन पवार याला विचारणा करण्यासाठी मनोजचे नातेवाईक गेले. यावेळी राहुल चंदू पवार, शाम रुंजा पवार, कैलास रुंजा पवार, काशिनाथ रुंजा पवार, चंदू पवार यांनी हातातील लाकडी दांडके, काठ्यांच्या साहाय्याने मनोजचे भाऊ, वडील, बहीण, आदींना बेदम मारहाण करून जखमी करीत जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर जखमी सकट कुटुंब उपचारांसाठी बिटको रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, वडारवाडी येथून गाडीवर जाणारा दीपक दिनेश फाजगे यालादेखील राहुल रुंजा पवार याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Family beaten by mob in Deolali village