शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोजणी न करता फौजफाटा परत

By admin | Updated: April 9, 2017 00:46 IST

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई महामार्गाच्या मोजणीसाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही विरोध कायम ठेवला.

  सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई महामार्गाच्या मोजणीसाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही आपला विरोध कायम ठेवला. त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शिवडे येथील मोजणी न करता माघारी परतावे लागले. तथापि, वनविभागाची घोरवड व शिवडे शिवारातील सुमारे एक किलोमीटर जमिन मोजण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र शिवडे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन मोजू दिली नाही. शुक्रवारी दुपारपासून शिवडे येथे समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी प्रारंभ करण्यात आला आहे. शुक्रवारी मोजणीप्रसंगी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मोजणीला विरोध करणाऱ्या सुमारे ४५ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या शेतकऱ्यांना पहाटे तीन वाजता सोडून देण्यात आले होते. शनिवारी दुपारी भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार मनोजकुमार खैरनार हे पोलीस व शीघ्रकृतीदलाचा मोठा फौजफाटा घेवून शिवडे येथे दाखल झाले होते. शनिवारी मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाची रणनिती बदलली होती. अधिकारी मोजणीला येणार असल्याने वातावरण तणावपूर्ण होते. सर्व शेतकऱ्यांनी एकाच ठिकाणी न थांबता प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर कुटुंबासह थांबून होते. आबालवृद्ध व महिला मोजणीला बांधावर थांबून विरोध करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पांढुर्ली-शिवडे रस्त्यावरील साई मंदिरात त्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले. चर्चेला काही शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना बागायती भागाची माहिती देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष पाहणी बोलवा असा आग्रह काही शेतकऱ्यांनी धरला. बागायती भागातून महामार्ग नेऊन शेतकरी उद्ध्वस्त करू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. याठिकाणी मोठे बागायती क्षेत्र असल्याने महामार्ग पर्यायी भागातून जाऊ द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी काही भागात मोजणीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र शेतकऱ्यांचा प्रखर विरोध पाहता शिवडे शिवारात मोजणी थांबविण्यात आली. त्यामुळे शनिवारी शिवडे येथे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी होऊ शकली नाही. सायंकाळी मोजणी अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा, अग्निशामक, रुग्णवाहिका माघारी फिरले. माघारी फिरल्यानंतर शेतकऱ्यांची पुन्हा शिवडे येथे बैठक झाली व जमिनी देण्यास विरोध कायम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)