विहीरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:26 IST2020-08-10T20:55:27+5:302020-08-11T01:26:21+5:30
चांदवड : मेसनखेडे खुर्द शिवारातील सचिन गोरख ठोेंबरे हा १९ वर्षीय तरुण दि. ८ आॅगस्ट २० पासून घरातून गायब होता. त्याचा मृतदेह सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी १२.३०वाजता मेसनखेडे शिवारातील गटनंबर २३५ मधील पुंजा रखमा ठोंबरे यांच्या विहीरीत सापडला.

विहीरीत पडून मृत्यू
चांदवड : मेसनखेडे खुर्द शिवारातील सचिन गोरख ठोेंबरे हा १९ वर्षीय तरुण दि. ८ आॅगस्ट २० पासून घरातून गायब होता. त्याचा मृतदेह सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी १२.३०वाजता मेसनखेडे शिवारातील गटनंबर २३५ मधील पुंजा रखमा ठोंबरे यांच्या विहीरीत सापडला. सदरची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करुन त्यांचे शव विहीरीतून वर काढले चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी पाठविले घटनेची माहिती मेसनखेडे येथील पोलसी पाटील अनिल मारुती ठोंबरे यांनी चांदवड पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र सौंदाणे, मंगेश डोंगरे, रविंद्र पेंढारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .