कांदा भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:45 IST2018-04-07T00:45:17+5:302018-04-07T00:45:17+5:30
येवला : सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा झालेली आवक व इतर राज्यांतूनही झालेली आवक याचा एकूणच परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे.

कांदा भावात घसरण
येवला : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केले असूनदेखील थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबर रांगडा कांद्याची राज्यभरातून सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा झालेली आवक व इतर राज्यांतूनही झालेली आवक याचा एकूणच परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे. राज्य शासनाने कांदा खरेदी केंद्र सुरू करावे किंवा कांद्याला प्रतिक्विंटल मागे ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. येवला बाजार समितीत शुक्र वारी (दि. ६) कांद्याची सुमारे सात हजार क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २५० रु पये, कमाल ७१७, तर सरसरी ६५० होते. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवण चाळीत झालेली असताना निवडून उरलेला कांदा आता शेतकरी बाजारात आणू लागल्याने आवक वाढली. यामुळे येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे. सध्या मार्केटमध्ये येणाºया कांद्याचा स्तर आणि गुणवत्तादेखील सुमार दर्जाची आहे. यावर्षी निसर्गाने बºयापैकी साथ दिल्याने व शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले. प्रारंभी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी कांदा लागवडीवर भर दिला. मात्र सध्या कांदा बाजारभावात होणारी घसरण पाहता शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे दर्शवित आहे.