शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

कांद्यापाठोपाठ टमाट्यात घसरण; उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:15 PM

कांद्याच्या दरात सातत्याने घसरणीचे वातावरण असताना टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करण्याची वेळ उत्पादकांवर आल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

वणी : कांद्याच्या दरात सातत्याने घसरणीचे वातावरण असताना टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करण्याची वेळ उत्पादकांवर आल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सध्या उपबाजारात कांदा व टमाट्याची आवक होते आहे. कांदा दरातील घसरण तितकीशी नसली तरी टमाट्याने न्यूनतम दराची पातळी गाठली आहे.तीस रु पये जाळीपासून शंभर रु पये जाळीपर्यंतचा दर सध्या मिळतो आहे. टमाटा खुडणी वाहतूक खर्चही अंगावर पडत असून, उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे उत्पादकांची अवस्था विकताही येत नाही व फेकताही येत नाही अशी झाल्याने पदरात पडेल त्या दरात टमाटा विक्र ी करणे एवढेच उत्पादकांच्या हातात आहे.दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्र ी भागातील टमाटा सध्या उजवा ठरत आहे. आकारमान व चवीलाही उत्तम असल्याने हा टमाटा नवापूर व गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहे. राजस्थानमध्येही समाधानकारक उत्पादन असल्याने तेथील मागणीही घटली आहे, तर उर्वरित राज्यामध्ये अपेक्षित मागणी राहिली नाही. परिणामी जिल्ह्यातील टमाट्याच्या मागणीचा आलेख घसरला आहे. त्याचा परिणाम दर घसरणीत झाल्याने उत्पादक कोंडीत सापडले आहेत. दरम्यान, उपबाजारात येणारे परप्रांतीय व्यापारीही थंडावले असून, टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर असूनही मागणी व ग्राहकांअभावी टमाटा मातीमोल दरात विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती