कौटुंबिक वादातून पोलिसाचा सावत्र मुलांवर केला गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:57 IST2019-06-21T16:56:11+5:302019-06-21T16:57:43+5:30

 पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.

Fake shot fencing on policemen | कौटुंबिक वादातून पोलिसाचा सावत्र मुलांवर केला गोळीबार 

कौटुंबिक वादातून पोलिसाचा सावत्र मुलांवर केला गोळीबार 

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्याचा सावत्र मुलांवर गोळीबारकौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची घटना

नाशिक :  पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत सोनू नंदकिशोर चिखलकर या 25 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर शुभम चिखलकर हा 22 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलीस कर्मचारी संजय अंबादास भोये याने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असून पंचवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  भोये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून पोलीसांनी भोये याच्याकडून गोळीबार केलेले पिस्तूल जब्त करून त्यालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस भोये यांच्या कुटुंबाची चौकशी करीत असून हा प्रकार भोये यांच्या कौटुंबिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातआ हे. 

Web Title: Fake shot fencing on policemen