भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 06:47 IST2026-03-31T06:47:04+5:302026-03-31T06:47:33+5:30

अमावास्या व पौर्णिमेस खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागत असे.

Fake Godman Ashok Kharat Charged Up to 5 Lakh for Home Visits | भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग

भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग

नाशिक : भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्महाउसवर घेऊन जाण्यासाठी इच्छुक असत. अशा आउट 'डोअर व्हिजिट'साठी खरात तब्बल पाच लाखांपर्यंत रक्कम आकारत असल्याची चर्चा आहे.

अमावास्या व पौर्णिमेस खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागत असे. मात्र, जो जास्त दाम देईल त्याच्याचकडे तो जात असे. एसआयटीनेदेखील तपासात हा खुलासा केला आहे. पुण्यातील एकाच अशा करोडपती भक्ताकडून पूजा करण्यासाठी वाहन हवे असे सांगून ९० लाखांची महागडी कार खरातने खरेदी करायला लावली होती. नंतर हीच कार अशोक खरातने स्वतःच्या नावावर करून घेतली.

भोंदू खरातच्या कार्यालयात अमावास्या व पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून दरबार भरत असत. दरबार रात्री उशिरापर्यंत चालत असे.

कोपरगावच्या मंदिरात प्रगट केला होता नाग?

भोंदूबाबा अशोक खरात याने कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात तो येऊन गेल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे. शिवाय या मंदिरात त्यांनी चक्क नाग प्रगट केल्याची माहिती पोलिस प्रशासन व एसआयटीला देणार असल्याचेही चांदगुडे म्हणाले.

चांदगुडे यांच्या म्हणण्यानुसार भोंदूबाबा अशोक खरात हा कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात दोन वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी मंदिराचे काही ट्रस्टी उपस्थित होते, तर काही अनुपस्थित होते. भोंदुबाबाने येथे पूजा करत मोठा चमत्कार दाखविला. त्याने ट्रस्टींना डोळे मिटायला सांगितले अन् काही वेळाने त्यांनी डोळे उघडताच नाग देवता प्रगट झालेली दिसली. त्यावेळी सर्व ट्रस्टी घाबरून गेले होते. भोंदुबाबा व ट्रस्टी यांच्यावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
 

Web Title : फर्जी गुरु खरात ने लाखों वसूले; भेंट के लिए लंबी कतारें

Web Summary : स्वयंभू गुरु अशोक खरात ने भेंट के लिए ₹5 लाख तक वसूले। शुभ दिनों में महंगी कारों में भक्तों की कतारें लगीं। खरात पर एक भक्त से ₹90 लाख की कार खरीदने का आरोप है। उन्होंने एक मंदिर में सांप प्रकट करने का भी दावा किया।

Web Title : Fake Guru Kharat Charged Lakhs; Long Queues for Visits

Web Summary : Self-proclaimed guru Ashok Kharat charged up to ₹5 lakh for visits. Devotees lined up in expensive cars on auspicious days. Kharat allegedly made a devotee buy him a ₹90 lakh car. He also claimed to conjure a snake at a temple.