वृद्धेची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:28 IST2018-09-12T00:19:27+5:302018-09-12T00:28:13+5:30
प्लॉट अस्तित्वात नसतानाही तो नावावर असल्याचे सांगत दोन संशयितांनी वृद्धेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित मिलिंद मधुकर भालेराव आणि दत्तात्रय निंबा शिंदे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

वृद्धेची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचे उघड
नाशिक : प्लॉट अस्तित्वात नसतानाही तो नावावर असल्याचे सांगत दोन संशयितांनी वृद्धेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित मिलिंद मधुकर भालेराव आणि दत्तात्रय निंबा शिंदे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
काठे गल्लीतील कुसुम रामदास काळे (६५) यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मिलिंद व दत्तात्रय यांनी महापालिका क्षेत्रात २०० चौरस मीटर प्लॉट स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून या प्लॉटची ४५ लाख रुपयांत विक्री केली़ या व्यवहारानंतर ८ फेबु्रवारी २०१३ रोजी त्यांना २५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले़ मात्र, काही कालावधीनंतर प्लॉट नावावर नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याने काळे यांनी संशयितांकडे तगादा लावला़ तसेच चौकशी केल्यानंतर संशयितांनी सांगितलेला प्लॉटच अस्तित्वात नसल्याचे समोर आले़ आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच काळे यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली़