शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

कळवणला घरगुती  गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 1:34 AM

शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने सुमारे १५ लाखांची वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसंसार खाक : तब्बल १५ लाखांचे नुकसान

कळवण :   शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने सुमारे १५ लाखांची वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.गॅस सिलिंडरचा स्फोट इतका जबरदस्त होता की घरावरील पत्रे उडाले. आगीने काही वेळेतच रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूचे नागरिक घरातून बाहेर पळाले. सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुमारे तीन तास आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनास्थळी कळवण नगरपंचायत, पोलीस स्टेशन, महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली. राहुल पगार, चेतन  पगार, प्रल्हाद शिवदे, बाळा निकम, टिनू पगार,राजेंद्र पगार,प्रदीप पगार, टग्या शेख, सचिन शिवदे, लौकिक शेख आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार, तहसीलदार बी. ए. कापसे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली.स्फोटामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या निमित्ताने कळवण शहरात अग्निशमन बंब व दलाची गरज असल्याची  प्रतिक्रिया  नागरिकांनी व्यक्त केली.  कळवण नगरपंचायतने अग्निशमन बंब शासनस्तरावर  प्रस्ताव दाखल केला असून ९० लाख रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे कौतिक पगार यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग