शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

कळवण येथे ३३ केव्ही उच्चवाहिनीवर स्फोट, एका कुटुंबाचे नुकसान

By admin | Updated: January 10, 2017 00:44 IST

दुर्घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; घराला तडे; वाहिनी भूमिगत करण्याची मागणी

 कळवण : कळवण शहरातील शिवाजीनगर भागातील सबस्टेशनच्या पाठीमागे असलेल्या नागरी समूह वस्तीत सोमवारी (दि. ९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास विजेच्या खांबावर मोठा स्फोट झाल्याने खांबालगत असलेल्या घरांना तडे गेले असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कळवणच्या वीज वितरणच्या सबस्टेशनच्या पाठीमागील परिसरातून ओतूर, नांदुरी, दळवट या ग्रामीण भागातील गावांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी ३३ केव्हीची उच्चदाब वाहिनी गेलेली आहे. घरांच्या जवळून विद्युतवाहिनी गेलेली असल्याने यापूर्वी येथे दुर्घटना घडल्या आहेत. आज भल्या पहाटे विजेच्या खांबावर स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. सुमारे दहा मिनिटे हा ज्वाला सुरू असताना जोरात स्फोट झाल्याने परिसरातील नागरिक या आवाजाने पहाटे झोपेत दचकून जागे होत भीतीने घराबाहेर आले. जवळीलच बापू दामू जाधव यांच्या घराच्या छतावर खांबाची एक वायर तुटून पडल्याने घराच्या छतासह मध्यभागी तडे गेले असून, घरातील वीज मीटरसह सर्व वायरिंग जळून खाक झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जाधव परिवार यातून बचावला. या घटनेमुळे हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या जाधव कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीज वितरण कंपनीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी बापू जाधव यांनी केली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करून हा प्रश्न मिटणारा नाही. सदर उच्चदाब वाहिनी भूमिगत करावी किंवा शहराच्या बाहेरून न्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)