शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

‘डेब्रीज’चा शहराला विळखा ; स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे  विद्रुपीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:03 AM

शहरातील विविध भागांत जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणारा सीमेंट, विटांसह घरातील विविध अविघटनशील वस्तू सर्रास रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या मैदानांवर फे कण्याचा प्रकार सुरू असून, महापालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने एककीडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे दुसरीकडे विद्रुपीकरण होत आहे.

नाशिक : शहरातील विविध भागांत जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणारा सीमेंट, विटांसह घरातील विविध अविघटनशील वस्तू सर्रास रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या मैदानांवर फे कण्याचा प्रकार सुरू असून, महापालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने एककीडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचे दुसरीकडे विद्रुपीकरण होत आहे.नाशिक शहरासह सिडको, अंबड, सातपूर, इंदिरानगर, वडाळा, उपनगर, नशिकरोड परिसरात अनेक वसाहतींमध्ये इमारतींचे नूतनीकरण त्याचप्रमाणे जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवनवे टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत. परंतु, जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणाºया सीमेंट, विटा, छताचे पत्रे यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या अविघटनशील वस्तू मोकळ्या मैदानावर फेकल्या जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले असून, त्यामुळे हरित शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी डेब्रीज दिसून येत आहे. त्यात गंगापूररोड, कॉलेजरोडसारखे उच्चभ्रू समजले जाणारे परिसरही या समस्येतून सुटले नसून रामवाडी परिसरातील खुल्या मैदानांवर त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुतर्फा अशाप्रकारे सीमेंट, विटा, मातीचे ढिगारे दिसून येत आहे.‘डेब्रीज’मध्ये  असतात हे घटकडेब्रीजमध्ये घराच्या छताचे पत्रे, तुटलेल्या विटा आणि निकामी सीमेंटसोबतच घरातील स्नानगृह वारण्यात येणाºया विविध साहित्यांसह चुना व विविध रंगांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या लादीच्या तुकड्यांचाही यात समावेश असतो.या ढिगा-यांमध्ये गंजलेल्या लोखंडाच्या सळई असल्याने भंगार करणारे काही जण त्या जमा करण्यासाठी येथे लोखंड काढताना जखमी होण्याचे प्रकारही घडतात. त्याचप्रमाणे, विटा आणि सीमेंटसोबतच अनेक जण घरातील कीटक मारण्याची औषधे, धारदार वस्तूही फेकत असल्याने भंगार जमा करणाºयांसोबत असलेल्या मुलांनाही गंभीर स्वरुपाची दुखापत अथवा विषबाधा होण्याची शक्यता असल्याने ‘डेब्रीज’चे हे ढिगारे शहराचे विद्रुपीकरण करण्यासोबत जीवघेणेही ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका