योजनांमध्ये गुंतलेले पैसे मिळण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:16 IST2019-02-06T16:15:56+5:302019-02-06T16:16:03+5:30
ब्राह्मण गाव : मैत्रेय कंपनीच्या विविध योजनांमध्ये संपूर्ण जिल्हाभरातून सर्व सामान्य जनतेचे लाखो - कोटी रु पये गुंतलेले असून कंपनी बंद पडल्यानंतर शासनाने लक्ष घालून मागील महिन्यात पोलीस खात्यामार्फत सर्व ग्राहकांचे लेखी अर्ज भरून घेतले असल्याने ग्राहकांच्या पैसे मिळतील अशा अपेक्षा वाढल्या असून अर्ज तर भरले मग पैसे केव्हा ? अशी विचारणा व प्रतिक्षा सर्वत्र केली जात आहे.

योजनांमध्ये गुंतलेले पैसे मिळण्याची अपेक्षा
ब्राह्मण गाव : मैत्रेय कंपनीच्या विविध योजनांमध्ये संपूर्ण जिल्हाभरातून सर्व सामान्य जनतेचे लाखो - कोटी रु पये गुंतलेले असून कंपनी बंद पडल्यानंतर शासनाने लक्ष घालून मागील महिन्यात पोलीस खात्यामार्फत सर्व ग्राहकांचे लेखी अर्ज भरून घेतले असल्याने ग्राहकांच्या पैसे मिळतील अशा अपेक्षा वाढल्या असून अर्ज तर भरले मग पैसे केव्हा ? अशी विचारणा व प्रतिक्षा सर्वत्र केली जात आहे.
या मैत्रेय कंपनीत जास्त नफा मिळेल या अपेक्षेने मोल मजुरी करणाऱ्या पासून ते सुशिक्षीत नागरिकांनीही मोठी रक्कम गुंतवणूक केली आहे..पोलीस प्रशासनाने सर्वत्र ग्राहकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन केले तेव्हा जनतेने सर्व कागद पत्राच्या झेरॉक्स जोडून नाशिक आॅफिस ला स्व खर्चाने जाऊन दिवस भर उपाशी रांगेत उभे राहून अर्ज जमा केलेत. त्याला म हिना दीड महिन्याचा काळ लोटला आहे, तेव्हा पोलीस प्रशासनाने या बाबत लवकर कार्यवाही करून गरीब जनतेचे कष्टाचे पैसे मिळून देऊन आशीर्वाद घ्यावेत अशी भावना गरीब ग्राहक व्यक्त करत आहेत.