शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मनसेसह अपक्ष स्थायीतून हद्दपार

By admin | Updated: March 4, 2017 01:47 IST

नाशिक : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या १४ मार्चला निवडणूक घेण्यात येणार असतानाच नगरसचिव विभागाने स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नियुक्तीचीही प्रक्रिया सुरू केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या १४ मार्चला निवडणूक घेण्यात येणार असतानाच नगरसचिव विभागाने स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नियुक्तीचीही प्रक्रिया सुरू केली आहे. स्थायी समितीवर भाजपाचे सर्वाधिक नऊ, तर शिवसेनेचे पाच सदस्य नियुक्त होतील, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढविल्याने आघाडीचे दोन सदस्य स्थायीवर असतील. मात्र, मागील पंचवार्षिक काळात सत्ताधारी असलेल्या मनसेसह अपक्षांचा एकही प्रतिनिधी स्थायीवर नसणार आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या १४ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. सदर निवडणूक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या १६ सदस्य नियुक्तीचाही प्रस्ताव महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विशेष महासभेत ठेवला आहे. मात्र, त्याच दिवशी स्थायीची निवडप्रक्रिया न करता महापौरांकडून त्यासाठी अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत, तर शिवसेनेचे ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. महापालिकेची एकूण सदस्यसंख्या १२२ आहे. १२२ भागीले १६ यानुसार प्रती सदस्य नियुक्तीसाठी ७.६२ चा कोटा आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक नऊ, तर शिवसेनेचे पाच सदस्य स्थायी समितीवर जातील. उर्वरित २ सदस्यांसाठी रस्सीखेच असेल. कॉँग्रेस-राष्ट्रवादीमिळून १२ सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केलेली होती. आता त्यांनी एकत्र गटनोंदणीही केल्यास त्यांचे दोन सदस्य स्थायीवर जाऊ शकतात. मात्र, मनसे, अपक्ष यांचा एकही सदस्य स्थायीवर नसेल. रिपाइं आणि भाजपा यांची केंद्र व राज्यात युती आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत रिपाइंला एकही जागा न सोडता भाजपाने रिपाइंविरुद्ध उमेदवार दिले होते. त्यात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा भाजपाचे रवींद्र धिवरे या उमेदवाराने पराभव केला, तर लोंढे यांच्या स्नुषा दीक्षा लोंढे या विजयी झाल्या. रिपाइंने भाजपाला पाठिंबा दिल्यास एखाद्या वर्षी रिपाइंच्या एकमेव सदस्याला भाजपाच्या कोट्यातून स्थायीचे सदस्यत्व मिळू शकते. गेल्यावेळी सत्ताधारी असलेल्या मनसेचा एकही सदस्य जाणार नाही, तर अपक्षांची सद्दी संपुष्टात आलेली आहे. (प्रतिनिधी)