नांदगाव वगळता पावसाची सर्वदूरहजेरी

By Admin | Updated: June 23, 2015 01:55 IST2015-06-23T01:54:44+5:302015-06-23T01:55:15+5:30

नांदगाव वगळता पावसाची सर्वदूरहजेरी

Except for Nandgaon, rain is a major attraction | नांदगाव वगळता पावसाची सर्वदूरहजेरी

नांदगाव वगळता पावसाची सर्वदूरहजेरी

  नाशिक : गेल्या २४ तासांत नांदगाव तालुका वगळता जिल्'ात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, काल (दि.२२) दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे चित्र होते. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने खरीप पिकांच्या पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. अगदी जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. त्यामानाने यंदा ७ जूनपासूनच पावसाने कमी-अधिक स्वरूपात सर्वच तालुक्यांत हजेरी लावल्याचे चित्र आहे. काल (दि.२२) सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची मिलिमीटरमध्ये तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - नाशिक - ३९.२, इगतपुरी - ९८, दिंडोरी - १९, पेठ - ७.०, त्र्यंबकेश्वर - ४५, मालेगाव - २.०, नांदगाव - ००, चांदवड - १५, कळवण - ७.२, बागलाण - ३.०, सुरगाणा - ७.४, देवळा - २.२, निफाड - ६.२, सिन्नर - २६, येवला - १३ असा एकूण - २९०.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थोडे तरी समाधानकारक पर्जन्यमान असल्याचे आकडेवारी सांगते. सोेमवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. सोेमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभर नाशिककरांनी रेनकोट व छत्र्या घेऊनच आपली कामे उरकली. (प्रतिनिधी)

Web Title: Except for Nandgaon, rain is a major attraction