माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:42 PM2019-02-12T14:42:11+5:302019-02-12T14:42:22+5:30

नांदूरवैद्य : नाशिक एज्युकेशनच्या भगूर येथील तिझाबाई झंवर विद्यामंदिर या शाळेच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

Ex Students | माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

googlenewsNext

नांदूरवैद्य : नाशिक एज्युकेशनच्या भगूर येथील तिझाबाई झंवर विद्यामंदिर या शाळेच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. २१ वर्षानी या बॅचचे ६५ माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी एकत्र येऊन उपस्थित गुरूजनांचा सत्कार केला.यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्र माचे कौतुक केले.या विद्यार्थ्यांनी सरपंच, सैनिक, व्यावसायिक, उद्योजक, खेळाडू, अभियंते, अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, कामगार, शिक्षक, शिक्षिका, समाजकारणी, गृहीणी, असे विविध क्षेञात योगदान दिले आहे. या संपूर्ण कार्यक्र माचे आयोजन संतोष जुंद्रे, अरु ण शेळके, संदीप काळे यांनी केले. अध्यक्षस्थानी विश्वास बोडके होते.माजी विद्यार्थिनी तृप्ती रामकांत गोविंद हिने शाळेला मदत दिली. याप्रसंगी नाशिक एज्युकेशनच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा पेठे विद्यायलयाचे मुख्याध्यापक एल.एस.जाधव, श्रीमती तारापूरकर, श्रीमती पठाडे, नांदूर्डीकर, राजाराम भदाने, रत्नाकर बकरे, प्रदीप कुलकर्णी, शिवाजी सोनवणे, मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते उपस्थित होते.

Web Title: Ex Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक