शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली गावातील अंगलो उर्दू हायस्कूलमध्ये दीड तास ईव्हीएम बंद 

By sandeep.bhalerao | Updated: May 20, 2024 09:08 IST

सुमारे दीड ते पावणे दोन तास मतदार ताटकळले.

नाशिक (संदीप भालेराव) : देवळाली गाव येथे अँग्लो उर्दू हायस्कूल मधील खोली क्रमांक 6 येथील मतदान यंत्र बिघडल्याने सुमारे दीड तास उशिराने मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. राखीव ईव्हीएम देखील बंद झाल्याने नवीन यंत्रे मागविण्याची वेळ आल्याने मतदानाचा सुरुवातीचा दीड तास वाया गेला.  नाशिक लोकसभा मतदारसंघातील देवळाली विधानसभा मधील देवळाली गावात अंगलो उर्दू हायस्कूल मधील मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा गोंधळ दिसून आला. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडणी करण्यात वेळ गेलाच शिवाय यंत्र देखील सुरू झाली नाही.  यंत्रे सुरू करण्यासाठी अर्धा तास खाटाटोप करण्यात आला. त्यानंतर नवीन यंत्र येऊ पर्यंत पुन्हा अर्धा तास वाट पाहावी लागली. त्यानंतर पुन्हा तपासणी, मॉक पोल आणि सिलिंग यासाठी वेळ गेल्याने सुमारे दीड ते पावणे दोन तास मतदार ताटकळले.

यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदानासाठी रंगा वाढत गेल्या असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदार केंद्रावर हरकत घेत मतदारांची एन्ट्री चुकीची असल्याचे सांगत गोंधळात अधिकच भर घातली. मतदान केंद्र अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात इंट्री कुठून असावी यावर खल चालला. अगोदरच मतदान यंत्रातील बिघाड आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने घेतलेला आक्षेप यामुळे मतदार अधिकच ताटकळले. अखेर मतदार उभे असलेल्या दरवाजातूनच एंट्री देण्यास पोलिसांनी मान्यता दिल्याने मतदारांनी सुस्कारा सोडला.

टॅग्स :nashik-pcनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४