शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीच्या भ्रष्टाचाराचे खासदारांनी दिले पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2016 02:32 IST

घरचा अहेर : हरिश्चंद्र चव्हाण यांनी दाखविले धनादेश

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्ह्यात नामांकित शाळेत हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याने अशा शाळांवर कठोर कारवाई करावी. तसेच नोकरभरतीत उमेदवारांकडून आर्थिक मागणी केली होती. त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता उमेदवारांना दिलेले धनादेश परत आले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील संबंधितांवर कठोर कारवाई करावी. इतकेच नव्हे तर आदिवासींच्या प्रश्नांची जाण नसलेल्या प्रधानसचिव राजगोपाल देवरा यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे.नाशिकला आदिवासी विकास महामंडळाच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नोकरभरतीतील आर्थिक नियमिततेचे आरोप करीत पुरावे दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही नोकरभरती आदिवासी विकास विभागात दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्या भरतीत शेकडो उमेदवारांकडून लाखो रुपये उकळण्यात आली. मात्र ज्यांना नोकरी लागली नाही. अशा लोकांना पैसे करत करण्याच्या बहाण्याने दिलेले धनादेश वटले नाहीत. ते आपल्याकडे असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण विभागातील कर्मचारी विनोद परदेशी यांनी पेठ तालुक्यातील १० ते १२ उमेदवारांना लाखो रुपयांचे दिलेले त्यांच्या खात्यावरील धनादेश वटलेले नाहीत. ही गंभीर बाब असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले पाहिजे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. आदिवासी विकास महामंडळाकडे पुरेशी गुदामे नसल्याने खरेदी केलेले धान्य वर्षानुवर्ष पडून राहते. त्यामुळे विविध कार्यकारी संस्थांचे आणि शासनाचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तत्काळ बैठक बोलवा, सर्व आदिवासी आमदार-खासदारांना या बैठकीसाठी बोलवा, असेही खासदार चव्हाण यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळाचे संचालक कोणाच्या मेहेरबानीने नव्हे तर लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांची वर्ष वर्ष बैठक होत नाही, हे दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर नोकरभरतीत पैसे गोळा करणाऱ्या व नंतर उमेदवारांना धनादेश देणारा विनोद घनश्यामसिंग परदेशी यांच्या नावे असलेले तीन धनादेशांची छायांकित प्रत त्यांनी दाखविली. नोकरभरतीतील लाखोे रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाला त्यामुळे बळकटी मिळाली आहे. (प्रतिनिधी)