शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक कार्यकर्ता हा पोलीसच : विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:08 IST

विघ्नहर्ता गणरायाचा मोठा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात कोठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे,

नाशिक : विघ्नहर्ता गणरायाचा मोठा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात कोठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे, मात्र शहरातील प्रत्येक लहान-मोठ्या मंडळांचा कार्यकर्ता साध्या वेशातील पोलीस आहे, हे विसरू नये, असे मत विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित शहराच्या शांतता समितीत व्यक्त केले.आगामी गणेशोत्सव आणि मुहर्रम हे हिंदू-मुस्लीम बांधवांचे सण सोबत साजरे होत आहेत. शहरात कायदासुव्यवस्था टिकून रहावी, या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मुख्यालयातील भीष्मराज सभागृहात शहराच्या मध्यवर्ती शांतता समितीची बैठक बुधवारी (दि.२८) बोलाविण्यात आली. या बैठकीला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, भक्तिचरणदास महाराज, गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, सुहास फरांदे, माजी महापौर अशोक दिवे, अशोक मुर्तडक, उपआयुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी नांगरे पाटील यांनी उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांकडून आलेल्या सूचनांची निश्चित दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. ज्या मंडळांना वाहतूक शाखेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही त्यांनाही लवकरात लवकर परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रत्येक मंडळाने त्याचे भान ठेवत या उत्सवाचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा आणि कायदासुव्यवस्थेचे पालन करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करून सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत उत्साहात साजरा करावा. कुठलीही अडचण जाणवल्यास पदाधिकाऱ्यांनी थेट जवळच्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांशी अथवा सहायक आयुक्तांशी थेट संपर्क साधावा, असेही नांगरे पाटील म्हणाले.यावेळी रामसिंग बावरी, गजानन शेलार, शंकरराव बर्वे, देवांग जानी, नगरसेवक सलीम शेख, वत्सला खैरे, आशा तडवी यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालनसहायक आयुक्त अशोक नखाते यांनी केले.गणेशोत्सवात  हेल्मेटसक्ती नकोगणेशोत्सवात हेल्मेटसक्तीचा नियम पूर्णपणे शिथिल करण्यात यावा, जेणेकरून नाशिककरांना गर्दीच्या काळात हेल्मेटचा त्रास जाणवणार नाही. हेल्मेटसक्तीच्या मोहिमेचे नाशिककरांनी स्वागतच केले आहे. गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरूपात हेल्मेटसक्तीला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर नागरिकांकडून करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयganpatiगणपती