विद्यार्थ्यांनी साकारला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:27 IST2018-12-30T00:10:28+5:302018-12-30T00:27:29+5:30
शिवनेरी किल्लाचा देखावा... असंख्य मावळ्यांच्या तलवारबाजीचे प्रात्यक्षिक... बाल शिवबाला पदोपदी मार्गदर्शन करताना मॉसाहेब जिजाऊ... स्वराज्य उभारणीनंतर ढोलताशांच्या गजरात सिंहासनावर बसून राज्याभिषेकाचा महाप्रसंग साक्षात तमाम नाशिककरांनी अनुभवला.

विद्यार्थ्यांनी साकारला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग
सिडको : शिवनेरी किल्लाचा देखावा... असंख्य मावळ्यांच्या तलवारबाजीचे प्रात्यक्षिक... बाल शिवबाला पदोपदी मार्गदर्शन करताना मॉसाहेब जिजाऊ... स्वराज्य उभारणीनंतर ढोलताशांच्या गजरात सिंहासनावर बसून राज्याभिषेकाचा महाप्रसंग साक्षात तमाम नाशिककरांनी अनुभवला. निमित्त होते ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित बाल शिवचरित्र महानाट्याचे.
गेल्या काही दिवसांपासून शाळेत ब्रेनव्हेव हा विशेष उपक्र म राबविला जात होता. त्यानंतर शाळेच्या ४०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने बाल शिवचरित्र महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानाट्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे लक्ष्मण सावजी, विनायक रानडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, स्वानंद बेदरकर, प्रा. श्याम बोराटे, सतीश थोरात, प्रा. फैयाज अहमद फैजी, संतोष वाटपाडे, शशांक मणेरीकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रज्ञा बोराटे यांनी अहवाल सादर केला. संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.