३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:58 AM2020-08-10T00:58:36+5:302020-08-10T00:59:25+5:30

त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सुसज्ज तयारी करण्यात आली आहे.

Equipped Covid Center with 350 beds | ३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर

ठक्कर डोममधील कोविड-१९ केअर सेंटरच्या उद्घाटनानंतर पाहणी करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, निमाचे अध्यक्ष शशीकांत जाधव, विलास शिंदे, अजय बोरस्ते, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, कृणाल पाटील आदी.

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन : क्रेडाई व मनपाचा पुढाकार

नाशिक : त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सुसज्ज तयारी करण्यात आली आहे.
कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्यसेवेचे एक आदर्श मॉडेल असून, त्याचा उपयोग हॉस्पिटल्समधील बेड संपुष्टात आल्यानंतरच केला जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी खासदार समीर भुजबळ, नोडल आॅफिसर डॉ. आवेश पलोड, निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव,
क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, जीतूभाई ठक्कर, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, सचिन बागड, हितेश पोद्दार आदी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त गमे म्हणाले की, नाशिकच्या स्लम भागात रु ग्णांची संख्या कमी झाली असून बंगले, कंपनी परिसर तसेच सोसायटी परिसरात रु ग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथके काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
क्रे डाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनानुसार क्रेडाइतर्फे ही सुसज्ज आणि आदर्श कोविड सेंटरची उभारणी करण्यात आल्याचे सांगितले.
कोविड सेंटरमधील अशी आहे सुविधा
रिक्रि एशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके, टीव्ही यांसह मनोरंजनाची तसेच रु ग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटरमध्ये निर्माण झाले आहे, असे भुजबळ म्हणाले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रे डाईने उभारलेलं कोविड केअर सेंटर सर्वोत्तम उपचार होतील, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Equipped Covid Center with 350 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.