देवळ्यात रविवारी पर्यावरणपूरक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:25 IST2021-01-22T00:25:19+5:302021-01-22T00:25:19+5:30
देवळा : येथील नगर पंचायतीच्यावतीने रविवारी (दि. २४) ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

देवळ्यात रविवारी पर्यावरणपूरक रॅली
देवळा : येथील नगर पंचायतीच्यावतीने रविवारी (दि. २४) ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत पर्यावरण पूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीची सुरुवात देवळा नगर पंचायत कार्यालयापासून सकाळी ७.३० वाजता होईल. बस स्थानक मार्ग, वाजगाव रस्त्यावरील नवीन तहसील कार्यालयापर्यंत रॅली जाईल व तेथून परतीचा मार्ग वाजगाव रोड, बस स्थानक, निमगल्ली, निरंजन चौक, पंचायत समिती, सराफ बाजार पेठ व शेवटी पाचकंदिल चौकात सायकल रॅलीची सांगता होणार आहे.
सदर सायकल रॅलीचा उद्देश हा आरोग्यदायी जीवनशैली व पर्यावरणपूरक वाहनाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा आहे. देवळा शहरातील नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी केले आहे.