वृक्षाना रंग देऊन पर्यावरणपूरक धूलिवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 10:51 PM2022-03-19T22:51:14+5:302022-03-19T22:52:47+5:30

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे परिसरात ग्रीन शिवा फाउंडेशनच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.१८) अनोख्या पद्धतीने धूलिवंदन सन साजरा करण्यात आला.

Environmentally friendly dusting by coloring the trees | वृक्षाना रंग देऊन पर्यावरणपूरक धूलिवंदन

झाडांचा किडीपासून बचाव करण्याचे काम काव आणि चुना, औषध करीत असते.

Next
ठळक मुद्देग्रीन ट्री फाउंडेशनच्या वतीने अनोख्या पद्धतीने धूलिवंदन

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे परिसरात ग्रीन शिवा फाउंडेशनच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.१८) अनोख्या पद्धतीने धूलिवंदन सन साजरा करण्यात आला.

ग्रीन ट्री फाउंडेशनतर्फे लावण्यात आलेल्या जंगली झाडांना औषध, काव आणि चुना, रंग लावून तसेच झाडांना पाणी घालून धूलिवंदन सण साजरा करण्यात आला.
झाडांचा किडीपासून बचाव करण्याचे काम काव आणि चुना, औषध करीत असते. धूलिवंदन सण पर्यावरणपूरक पध्दतीने ग्रीन ट्री फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन म्हस्के, दत्तात्रय शेंडगे, बाबासाहेब यादव, जीवन जाधव, बिरुदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, दीपक महानवर, भाऊसाहेब कोळपे, किरण भोसले, विजय सकट, राहुल कुंभार उपस्थित होते.

(...?)

वृक्षाना रंग देऊन पर्यावरणपूरक धूलिवंदन सण साजरा करताना ग्रीन ट्री फाउंडेशनचे सदस्य.

Web Title: Environmentally friendly dusting by coloring the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.