अभियंता दिन विविध उपक्र मांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:33 IST2018-09-16T00:29:31+5:302018-09-16T00:33:17+5:30

दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या वतीने ५१ वा अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील अभियांत्रिकी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Engineer day celebrated with various epics | अभियंता दिन विविध उपक्र मांनी साजरा

अभियंता दिन विविध उपक्र मांनी साजरा

ठळक मुद्देगुणवंतांचा गौरव : इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स शाखेच्या वतीने कार्यक्रम

सातपूर : दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या वतीने ५१ वा अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील अभियांत्रिकी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
संस्थेच्या अशोका हॉल येथे आयोजित कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, संस्थेचे नॅशनल कौन्सिल मेंबर महेंद्र कोठारी उपस्थित होते. यावेळी नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील तेजस्विनी तवर, वीरेंद्र पाटील, पूजा पानगव्हाणे, परेश चौधरी, लिशा अल्वा, मोहिनी फोपसे, नेहा मिश्री, सौरभ मोहरीर, शुभम मोराडे, मृण्मयी कुलकर्णी, प्रशांत मुसळे, शुभम चौक, प्रसाद महाले, पल्लवी कदम, अपेक्षा बरहे, गीता कहंडळ, सारिका हिरे, स्नेहल पगारे, पूजा निकुंभ, दीपाली सोनवणे, कुलदीप पवार, शुभम कुशारे, तन्मयी अहिरे, वैष्णवी पाटील, प्रिया मंडलिक, श्वेता राऊत, श्रेया राजगुरू, राजलक्ष्मी दरेकर, सौरभ बोरसे, अरविंद साळमुठे, शुभांगी रोकडे, पूजा गजेरा, रोशन टर्ले, दीप्ती ब्राह्मणकर, रु चिका बोराडे, आशिष थोरात आदी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक भाषणात अभियंता शाखेचे अध्यक्ष संतोष मुथा यांनी संस्थेच्या कार्याची आणि विविध उपक्र मांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. विपुल मेहता यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष विजय कोठारी, नरेंद्र बिरार आदींसह विविध क्षेत्रातील अभियंते, अधिकारी व पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Web Title: Engineer day celebrated with various epics