कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठाअंमलबजावणी : दिवसा आठ तास वीज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:26 AM2017-12-11T00:26:50+5:302017-12-11T00:33:26+5:30

नाशिक : सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना दि. ९ मध्यरात्रीपासून रात्री १० तास व दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने पूर्ववत तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Enforcement of power supply to agriculture consumers as before: Electricity will be repaired for eight hours a day | कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठाअंमलबजावणी : दिवसा आठ तास वीज पूर्ववत

कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठाअंमलबजावणी : दिवसा आठ तास वीज पूर्ववत

googlenewsNext
ठळक मुद्देकृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठाअंमलबजावणी : दिवसा आठ तास वीज पूर्ववत

नाशिक : सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना दि. ९ मध्यरात्रीपासून रात्री १० तास व दिवसा आठ तास चक्राकार पद्धतीने पूर्ववत तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आॅक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे देशात कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. परिणामी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळात बदल करून रात्री आठ तास व दिवसा आठ तास अशा पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येत होता.
शेतकºयांच्या वीजपुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी व वीजप्रणालीच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने विभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून, त्याची अंमलबजावणी दि. ५ आॅक्टोबरपासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार कृषिभाराचे योग्य नियोजन करून कृषिपंपाच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर २०१७ते फेब्रुबारी २०१८ या मासिक कालावधीत या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू राहणार आहे.

Web Title: Enforcement of power supply to agriculture consumers as before: Electricity will be repaired for eight hours a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.