शालिमारला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:31 IST2019-02-09T00:12:46+5:302019-02-09T00:31:18+5:30

अतिक्रमण विभागाकडून शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे काम चालू असताना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार अर्थात राष्ट्रमाता इंदिरा गांधी चौकात मात्र अनधिकृत अतिक्रमणाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

Encroachment of encroachment in Shalimar | शालिमारला अतिक्रमणाचा विळखा

शालिमारला अतिक्रमणाचा विळखा

ठळक मुद्देचौकाचा कोंडला श्वास अनधिकृत रिक्षाचालक, विक्रेत्यांमुळे अडथळा

नाशिक : अतिक्रमण विभागाकडून शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे काम चालू असताना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार अर्थात राष्ट्रमाता इंदिरा गांधी चौकात मात्र अनधिकृत अतिक्रमणाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
शालिमारहून नाशिकरोड रेल्वेस्टेशन, देवळाली कॅम्प व भगूरला जाण्यासाठी येथून दिवसभर बसेस असतात. शालिमारपासून जवळच्याच अंतरावर अनेक शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा व दवाखाने असल्याने येथे दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या कारंजाचेही विद्रुपीकरण या अतिक्रमणामुळे होत आहे. पंजाबी ड्रेस, चप्पल-बूट, घरगुती उपकरणे, बेशिस्त रिक्षाचालक व अशाप्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणामुळे पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना याचा त्रास होत आहे.
दरम्यान, सायंकाळच्या वेळेस येथे मोबाइल व रोकड रक्कम हिसकावणे असे प्रकार घडत आहेत. रिक्षाचालकांकडून अनेकदा प्रवाशांना अरेरावी केली जाते़ सदर प्रकार थांबवून बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावावी. अशी मागणी दीपक डोके यांनी केली आहे़

Web Title: Encroachment of encroachment in Shalimar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.