भगूरच्या शिवाजी चौकाला अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:39 IST2020-08-20T21:02:11+5:302020-08-21T00:39:18+5:30
भगूर येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात टपऱ्या व खाद्यपदाथांच्या हातगाडयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे

भगूरच्या शिवाजी चौकाला अतिक्रमणाचा विळखा
भगूर : येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात टपऱ्या व खाद्यपदाथांच्या हातगाडयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण
होत असल्याने नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे
भगूर शहरातील शिवाजी महाराज चौक हाच मुख्य दळणवळण आणि बाजारपेठेचा गजबजलेला विभाग आहे. याठिकाणी बालाजी मंदिर ते नामको बँक रस्त्यालगत एक हातगाडा अनेक महिन्यापासून रिकामे स्थीतीत उभा आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याच ठिकाणी काहींनी आपल्या व्यावसाईक मांडण्या ठेवल्या आहेत.
व्यवसाय आटोपल्यावर आपल्या मांडण्या आणि हातगाडे घरी घेऊन जाण्याचे भगुर नगर पालिकेचे सक्तीचे आदेश आहेत मात्र याकडे या व्यवसायिकांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे मोठ्या चारचाकी गाड्याना वाहतुकीस अडथळा निर्माण होत
आहे.
भगूर आठवडे बाजारात टपऱ्यांचे अतिक्रमण काढून जप्त केल्या होत्या त्याप्रमाणे शिवाजी महाराज चौकातही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली जात आहे.