युवकाला मिळाली रोजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:53 IST2019-12-29T22:51:47+5:302019-12-29T22:53:06+5:30
येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथील बेरोजगार तरुण रामेश्वर रघुनाथ चिवडगर यास जिल्हा परिषद अंतर्गत चारचाकी वाहनाचे वितरण शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कारभारी पाटील आगवन होते.

सोमठाणे येथे चारचाकी वाहन वितरणप्रसंगी कुणाल दराडे, प्रमोद बोडके, लक्ष्मण घुगे, रामभाऊ केदार, परसराम दराडे आदी.
राजापूर : येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथील बेरोजगार तरुण रामेश्वर रघुनाथ चिवडगर यास जिल्हा परिषद अंतर्गत चारचाकी वाहनाचे वितरण शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कारभारी पाटील आगवन होते.
राजापूर जिल्हा परिषद राजापूर गटाच्या सदस्य सुरेखा दराडे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत वीस टक्के अनुदानावर चारचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. येवला तालुक्याचे शेवटचे टोक सोमठाण जोश हे गाव असून, या गावातील तरुण रामेश्वर चिवडगर या तरुणाला चारचाकी वाहन २० टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. यावेळी कुणाल दराडे यांनी शहीद जवान नवनाथ कारभारी आगवन यांच्या स्मारकाला पेव्हरब्लॉक देण्याचे आश्वासन दिले आहे. माजी सभापती पोपट आव्हाड, येवला तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण घुगे, माजी सरपंच रामभाऊ केदार, परसराम दराडे, प्रमोद बोडके, एकनाथ सदगीर, बारकू शिंगाडे, ग्रामविस्तार अधिकारी रामदास मंडलिक, माधव आगवन, निवृत्ती पठाडे आदी उपस्थित होते.