कर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:50 IST2019-01-13T21:56:11+5:302019-01-14T00:50:09+5:30

टॅक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच करिअर करण्याच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ यांनी केले.

Employment opportunities available in the tax sector | कर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध

आरंभ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी मुकुंद कोकीळ, जयंत मोंढे , प्राचार्य प्र. ला. ठोके, उपप्राचार्य प्रा. सुनील हिंगणे, प्रा. संगीता पवार, मंगला जाधव, प्रा. भरत खंदारे, प्रा. आनंद खरात, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. संदीप गांगुर्डे आदींसह विद्यार्थी.

ठळक मुद्देमुकुंद कोकीळ : आरंभ महाविद्यालयात स्नेहसंमेलन

नाशिकरोड : टॅक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच करिअर करण्याच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ यांनी केले.
साने गुरुजीनगर येथील आरंभ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणप्रसंगी कोकीळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्र. ला. ठोके, प्रा. संगीता पवार, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा मंगला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली. पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी, क्रीडा स्पर्धा तसेच स्नेहसंमेलननिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रास्ताविक उपप्राचार्य सुनील हिंगणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आनंद खरात व प्रा. प्रदीप वाघ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संगीता पवार यांनी करून दिला. आभार प्रा. भरत खंदारे यांनी मानले.
कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. कैलास निकम, प्रा. श्रीकृष्ण लोहोकरे, प्रा. संदीप निकम, प्रा.राजेश खताळे, प्रा.नीलेश खैरनार, प्रा. यशवंत सूर्यवंशी, प्रा.संदीप गांगुर्डे, प्रा.सुरेखा पवार, प्रा.अर्पणा बोराळे आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Web Title: Employment opportunities available in the tax sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.