Empire of the garbage at Godaghat after the Chatpooja | छटपुजेनंतर गोदाघाटावर कचऱ्याचे साम्राज्य
छटपुजेनंतर गोदाघाटावर कचऱ्याचे साम्राज्य

ठळक मुद्देठिकठिकाणी कचरा ओले कपडे, नारळ, निर्माल्याचे खचमहापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

नाशिक : गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले. यामुळे रविवारी (दि. ३) गोदाघाट परिसरात कचरा, निर्माल्य, ओले कपड्यांचे ढिगारे जागोजागी दिसून आले.
       नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून यामुळे गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंपरेप्रमाने या दिवशी घरातील महिला तीन दीवस देवीचा उपवास ठेवतात व शेवटच्या दिवशी संध्याकाळी सोईप्रमाने नदी, समुद्र , तलाव, घाट अशा ठिकाणी पाण्यात उतरु न मावळत्या सुर्याला व सकाळी पुन्हा उगवत्या सुर्याला नैवेद्य जे शेतातील नवीन पिक, भाजी, फळ, कंदमुळे, ऊस, घरचा प्रसाद सुर्याला अर्पन करु न तीन दिवसांचा उपवास सोडतात. मात्र यानंतर महिलांनी आपल्याजवळील सर्व निर्माल्या जागोजागी फेकुन दिल्यामुळे गोदाघाटाला कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले होते. रामकुंड परिसरात कचºयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. नदीचे प्रदुषण होऊ नये म्हणून महापालिकेने लाखो रुपये खर्च केले आहे. मात्र याठिकाणी कचरा, भाजीपाला, अस्तावस्थ पडलेले कपडे नेहमीच पडलेले दिसतात. त्यात छटपुजेनंतर यात मोठी भर पडल्याचे बघायला मिळाले. त्यात रविवारचा दिवशी घंटागाडी कर्मचाऱ्यांची सुट्टी असल्यामुळे दिवभर याठिकाणी कचरा असाच पडुन होता.

निर्माल्य पाण्यात
महापालिकेकडून गोदावरी परिसरात नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांचे काम थांबविल्यापासून येथील स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे रामकुंडात भाविकांकडून सर्रासपणे निर्माल्य सोडणे, दिवे सोडणे, कपडे, वाहन धुणे असे विविध प्रकार होत आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदुषणात वाढ होत असून याठिकाणी महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title:  Empire of the garbage at Godaghat after the Chatpooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.