Eleventh Admission Process: The possibility of allotment of information booklets till the end of May | अकरावी प्रवेश प्रक्रिया : मे अखेरपर्यंत माहिती पुस्तिका वाटपाची शक्यता
अकरावी प्रवेश प्रक्रिया : मे अखेरपर्यंत माहिती पुस्तिका वाटपाची शक्यता

ठळक मुद्देमाहिती पुस्तिकाचे टंकलेखन पूर्ण मुद्रीतशोधन सुरू आरक्षण तक्त्यामुळे लांबेली अकरावी प्रवेश प्रक्रियामे अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना शाळांना पुस्तिकांचे वाटप शक्य

नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के  आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लाबंल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 
नाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती. तर १० मेपासून विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. यंदा मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही आॅनलाइन प्रक्रियेस अद्याप सुरुवात झालेली नसल्याने दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी आणि पालकांना अकरावीच्या  प्रवेश प्रक्रियेची प्रतिक्षा लागली आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ९ मे रोजी रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली असली तरी अद्याप माहिती पुस्तिकेची प्रत्यक्ष छपाई सुरू झालेली नाही. आतापर्यंत केवळ टंकलेखन झाले असून मुद्रीत शोधनाची प्रक्रिया सुरू आहे.   मुद्रीत शोधन पूर्ण झाल्यानचर तत्काळ सर्व पुस्तिकांची छपाई सुरू होणार असून मे महिन्यांच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तिका पडतील असा विश्वास नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक  कार्यालयाने व्यक्त केला आहे.गेल्यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अजार्चा पहिला भाग भरून घेण्यात आला होता. शहरातील विविध शाळांना ४ मे रोजीच माहिती पुस्तिकांचे  वाटप करण्यात आले होते.तर १० मे पासूून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांची विक्री सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालापूर्वी प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण करून निकालानंतर दुसरा भाग भरला होता. असे असतानाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुमारे १२ आॅक्टोबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्यात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेसाठी तयारी करता आली नाही. त्या पार्श्वभूमिवर यंदा  प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अरेक्षा असतना अद्यापही प्रवेश प्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी उमटत आहे.  


Web Title: Eleventh Admission Process: The possibility of allotment of information booklets till the end of May
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.