सेवाकुंज रिक्षास्टॅण्डजवळील  विद्युत रोहित्रास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:02 IST2018-12-22T01:01:56+5:302018-12-22T01:02:10+5:30

वार शुक्रवार, वेळ दुपारी पावणेदोन वाजेची, ठिकाण सेवाकुंज रिक्षास्टॅण्ड़ याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रातून जाळ निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले़

Electric Rohitas fire near Suryquan Rikshashand | सेवाकुंज रिक्षास्टॅण्डजवळील  विद्युत रोहित्रास आग

सेवाकुंज रिक्षास्टॅण्डजवळील  विद्युत रोहित्रास आग

पंचवटी: वार शुक्रवार, वेळ दुपारी पावणेदोन वाजेची, ठिकाण सेवाकुंज रिक्षास्टॅण्ड़ याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रातून जाळ निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले़
मात्र आग विझून जाईल, अशी शक्यता असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले व विद्युत रोहित्राने पेट घेतला़ याचवेळी परिसरातील काही नागरिकांनी पोलीस व पंचवटी अग्निशामक दल तसेच विद्युत वितरण कंपनीस माहिती कळविली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचवटी अग्निशामक दल वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली़ सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Electric Rohitas fire near Suryquan Rikshashand