विद्युत पोल रस्त्यावर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:08 IST2020-02-02T16:07:33+5:302020-02-02T16:08:08+5:30
वाडिवºहे: येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका ट्रकने लोंबकळलेल्या विजेच्या तारा ट्रकने ओढुन घेतल्याने त्या सोबत विद्युत खांब देखील कोसळून रस्त्यावर पडला. यावेळी मोठा आवाज होऊन शार्ट सर्किट झाले.सुदैवाने ट्रकच्या पाठिमागे कुठलेही वाहन नव्हते तसेच रविवार असल्याने शाळेला देखील सुट्टी होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

विद्युत पोल रस्त्यावर कोसळला
ठळक मुद्दे वाडिवºहे:ट्रकने तारा ओढल्याने दुर्घटना
वाडिवºहे फाटा ते गाव यादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर एक ट्रक जात असतांना खाली लोंबकळत असलेल्या विद्युत तारा त्यास अडकल्यामुळे जोरदार झटक्याने विद्युत पोलसह तारा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. यावेळी सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
विज वितरण महामंडळाने याकडे गांभिर्याने बघून गावातील अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या तारा,मोडकळीस आलेले खांब,उघडे ट्रांसफार्मर यांची दुरु स्ती करावी व रस्त्यात असलेल्या तारा उंच करण्यात त याव्यात म्हणजे अशा दुर्घटना टाळल्या जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त केली. (02वाडिवºहे तारा )