निफाड : ईव्हीएमचा वापर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपासून ते राष्ट्रीय निवडणूकांपर्यंत सर्वच स्तरांत सुरु झाला. याच आधुनिक निवडणूक प्रक्रि येचा अनुभव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना यावा यादृष्टीने निफाड तालुक्यातील बोकडदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मंदाकीनी भागवत व शिक्षक प्रदीप देवरे यांच्या कल्पनेतून ईव्हीएम अॅपद्वारे शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीचं वैशिष्टय म्हणजे ही तीन पद्धतीने घेतली गेली.जिल्हा परिषदेच्या बोकडदरे येथील शाळेतील विद्यार्थी सभा ज्याची ईव्हीएम च्या सहाय्याने प्रत्यक्ष निवडणूक घेण्याचे ठरले प्रत्येक वर्गातून १५ विद्यार्थ्यांसाठी एक असे १७ विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले. यासाठी निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. यात निवडणुकीची अधिसूचना उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान घेणे व मतमोजणी करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला होता.पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांसाठी आठ मोबाईलवर ईव्हीएम अॅपमधे उमेदवारांची नावे सेट करण्यात आली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मॉक पोल घेण्यात आले. त्यानंतर वर्गवार मोबाईलवर मतदान घेण्यात आले. त्यानंतर निकाल घोषीत करण्यात आला.दुसऱ्या दिवशी निवडून आलेल्या १७ प्रतिनिधींमधून मुख्यमंत्री पदासाठी पसंती क्र म पध्दतीने मतदान घेण्यात आले. यात सर्वात जास्त १ क्र मांकाचा पसंतीक्र म मिळालेल्या प्रतिनिधीला मुख्यमंत्री म्हणून घोषीत करण्यात आले.तसेच विद्यार्थी सभेला मदत व्हावी म्हणून विद्यार्थी परिषद ह्या दुसºया सभागृहासाठी १२ स्वीकृत प्रतिनिधींची वक्तशिरपणा, नियमितता, आरोग्य व स्वच्छतेची आवड, इतरांशी प्रेमाने वागणे इ. निकष लावून निवड करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कॅबिनेट तसेच राज्य मंत्रीपदे देण्यात आली. शाळेच्या प्रांगणात सर्व मंत्री, विद्यार्थी सभेतील सदस्य तसेच विद्यार्थी परिषदेतील सदस्य यांना निफाडचे तहसिलदार दिपक पाटील यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. याप्रसंगी बोकडदरे गावच्या सरपंच आशा दराडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब सानप, सुनिल क्षिरसागर उपस्थित होते.शालेय मंत्रिमंडळ पुढीलप्रमाणेमुख्यमंत्री-मोनाली चव्हाण, उपमुख्यमंत्री-चेतन बर्डे, सांस्कृतिक कार्यमंत्री-स्नेहल सानप, परीपाठ मंत्री-सलोनी पवार, आरोग्य व स्वच्छता मंत्री-पूनम माळी, सहल मंत्री रेणूका सोनवणे, अभ्यास मंत्री-निकीता जाधव, क्र ीडामंत्री-साईनाथ जाधव.
ईव्हीएम अॅपच्या मदतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:23 IST
निफाड : ईव्हीएमचा वापर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपासून ते राष्ट्रीय निवडणूकांपर्यंत सर्वच स्तरांत सुरु झाला. याच आधुनिक निवडणूक प्रक्रि येचा अनुभव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना यावा यादृष्टीने निफाड तालुक्यातील बोकडदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मंदाकीनी भागवत व शिक्षक प्रदीप देवरे यांच्या कल्पनेतून ईव्हीएम अॅपद्वारे शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीचं वैशिष्टय म्हणजे ही तीन पद्धतीने घेतली गेली.
ईव्हीएम अॅपच्या मदतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक
ठळक मुद्देनिफाड : बोकडदरे शाळेचा उपक्रम; तहसिलदारांनी दिली पद, गोपनीयतेची शपथ