शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

नांदूरशिंगोटे अपघातात वयोवृद्ध महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 1:17 AM

वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

नांदूरशिंगोटे : वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. कौसाबाई संतू बोडके (६५) रा. वडझिरे, ता. सिन्नर असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत वावी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदूरशिंगोटे येथे नातेवाइकांचा विवाह सोहळा आटोपून घरी परतत असताना सदरचा अपघात घडला आहे. वडझिरे येथील संतू बाबुराव बोडके (७०) व त्यांच्या पत्नी कौसाबाई बोडके हे वयोवृद्ध दाम्पत्य दुचाकी मोटारसायकल क्रमांक (एम.एच. १५, बी. एम. ३९७७) हिने नांदूरशिंगोटे येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर आपल्या दुचाकीने घरी जात असताना त्याच दरम्यान नांदूरशिंगोटे बाह्य वळण रस्त्यावर खासगी बस क्रमांक (एम.एच.१७, ए.जी. ६५६८) ही संगमनेरकडे जात असताना सदरचा अपघात घडला अपघात कौसाबाई ह्या गंभीर जखमी झाल्याने जागेवरच गतप्राण झाल्या. तर पती संतू हे जखमी झाले आहे. मंगल कार्यालयापासून अवघ्या शंभर ते दोनशे फूट अपघात झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा वडझिरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू