बुंधाटे येथे एकलव्य जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 19:39 IST2021-03-11T19:38:43+5:302021-03-11T19:39:23+5:30
डांगसौंदाणे : बुंधाटे ( ता.बागलाण) येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

बुंधाटे येथे एकलव्य जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन करतांना लक्ष्मण खैरनार, अंबादास मोरे आदी.
डांगसौंदाणे : बुंधाटे ( ता.बागलाण) येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बुंधाटे येथील वीर एकलव्य संघटनेकडून एकलव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खैरनार व् सल्लागार राजेंद्र खैरनार यांनी वीर एकलव्य प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर एकलव्य प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर आदिवासी बांधवांना लक्ष्मण खैरनार यांनी वीर एकलव्य यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. येथील ग्रामपंचायत कार्यालयातही एकलव्य प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच निर्मला साबळे, उपसरपंच नंदू बैरागी, हेमंत चंद्रात्रे, राजेंद्र खैरनार, सखाराम खैरनार, अंबादास मोरे, रंगनाथ सोनवणे, भास्कर माळी, दामू सोनवणे, विक्रम पवार, मोठाभाऊ दळवी, प्रवीण पवार, दादा पवार आदि उपस्थित होते.