शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अवकाळीने जिल्ह्यातील  १२०० शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:34 AM

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानीचा अहवाल कृषी खात्याने महसूल विभागाला सादर केला असून, त्यात कमी-अधिक होऊ शकते.  मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर तालुक्यांतील ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले.  विजेचा कडकडाट करीत मुसळधार कोसळलेल्या या पावसाने वीज कोसळून आठ बळी घेण्याबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची धावपळ उडून, उभ्या पिकाचे नुकसान सोसावे लागले. प्रामुख्याने गहू, कांदा, टोमॅटो, मिरची, भाजीपाला या प्रमुख पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, लिंबू, आंबा, कलिंगड या फळपिकांनाही फटका बसला. द्राक्षाची बाग वादळी वाºयात कोलमडून पडली तर खळ्यात काढून ठेवलेला उन्हाळ कांदाही पावसामुळे भिजला. टोमॅटोचे सुडे भुईसपाट झाल्या. भाजीपाल्याचेही नुकसान झाले. सलग तीन दिवस अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना शासनाकडून मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात न आल्याने कृषी व महसूल खाते हात बांधून बसले, परिणामी शेतकºयांनी आणखी नुकसान नको म्हणून आपल्या शेतातील आवरासावर करून घेतली. त्यानंतर चार दिवसांनी शासनाला या अवकाळी पावसाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात जिल्ह्णातील ५४ गावांमधील शेतीपिकांना अवकाळीचा फटका बसला असून, त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले. ३८२ हेक्टर क्षेत्रावरील कांदा तर त्याखालोखाल ३०५ हेक्टरवरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. २५ हेक्टरवरील गहू, ४ हेक्टरवरील टोमॅटो भुईसपाट झाले. डाळिंबाचे १७१ हेक्टर तर द्राक्षाचे २१ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. चिकू, लिंबू, आंबा, कलिंगड, मिरची, भोपळा, काकडी या पिकांचेही कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. एकूण २१८ हेक्टरवरील फळपिके तर ७२२ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीत राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा कमी व अधिक नुकसानीची पाहणी करण्यात आली. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्यासच शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळणार असून, त्यापेक्षा कमी असल्यास कोणतीही मदत देय नाही. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येतील व नुकसानीची पाहणी केली जाईल. त्यात खºया अर्थाने नुकसानीचा आकडा निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय