पेगलवाडी येथे दत्तजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:09 IST2019-12-13T01:09:14+5:302019-12-13T01:09:31+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पेगलवाडी येथील श्री गुरुचरण सेवा आश्रमात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील दत्त मंदिर परिसराला रोषणाई करण्यात आली होती

पेगलवाडी येथे दत्तजयंती उत्साहात
दिंडोरी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पेगलवाडी येथील श्री गुरुचरण सेवा आश्रमात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील दत्त मंदिर परिसराला रोषणाई करण्यात आली होती तसेच दत्त मूर्तीस फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंदिरात अभिषेक व पूजन करण्यात आले. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर
पालखी सोहळा व मिरवणूक
झाली.
रात्री होमहवन होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. उत्सव यशस्वीतेसाठी महंत राजेशपुरी महाराज व भक्त परिवाराने परिश्रम घेतले.