शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

दुबार पेरणीचे संकट, पावसासाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:20 IST

देवळा/उमराणे : जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट असून, पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तीव्र दुष्काळानंतर चालू वर्षी जोरदार पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीही पावसाने ओढ दिल्याने अत्यल्प पावसावर केलेल्या पेरण्या पाण्याअभावी कोमजू लागल्या असून, मका पिकावर लष्करी अळीने अतिक्रमण केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात : उमराणेसह परिसरातील शेतकरी हवालदिल; आर्थिक नुकसानीचा फटका

देवळा/उमराणे : जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट असून, पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तीव्र दुष्काळानंतर चालू वर्षी जोरदार पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीही पावसाने ओढ दिल्याने अत्यल्प पावसावर केलेल्या पेरण्या पाण्याअभावी कोमजू लागल्या असून, मका पिकावर लष्करी अळीने अतिक्रमण केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप, रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले होते. परिणामी उत्पन्न तर दूरच; परंतु संपूर्ण वर्षभर पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा पुरविण्यासाठी या भागातील नागरिकांना जिकिरीचे बनले होते. त्यामुळे या वर्षी चांगला पाऊस पडेल व मागील दुष्काळाची तुट भरून निघेल या अपेक्षेपोटी शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही आगामी उत्पादनाच्या भरवशावर खासगी कर्ज घेत कंबर कसली होती. सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पाहिजे त्या प्रमाणात जोरदार पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबतील या भीतीपोटी आलेल्या रिपरिप पावसावर कमीअधिक ओलीवर या भागातील शेतकºयांनी मका, बाजरी, तूर, भुईमूग, कपासी, मूग आदींचे महागडे बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. परंतु पेरणी केल्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके कोमजू लागली आहेत. लष्करी अळींचा प्रादुर्भाव; उपाययोजनेची मागणीदुष्काळात तेरावा महिना म्हणून चालूवर्षी मका पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधाची फवारणी करण्याची वेळ आल्याने अस्मानी सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाणार असून, दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकºयांवर ओढावणार आहे. परिणामी अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया देवळा तालुक्याच्या पूर्व भागात सततच्या नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.जायखेड्यात पावसासाठी नमाजपठणजायखेडा : परिसरात पावसाने दडी मारल्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतोपयोगी पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना सर्वांना करावा लागत आहे. यामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. पाऊस पडावा यासाठी सर्वत्र होमहवन दुवा पठण करून वरूणराजाला साकडे घातले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जायखेडा येथील मुस्लीम बांधवांकडून गेल्या तीन दिवसांपासून येथील इदगाहजवळ नमाजपठण करून पावसासाठी दुवा मागितली जात आहे. मौलाना हफीज सलीम, नशिरखा पठाण, नईम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लीम बांधव नमाजपठणात सहभागी होत आहेत. पाऊस न झाल्याने सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पिके वाया गेली असून, विहिरींना पाणी नसल्याने मानवासह जनावरांचे हाल होत आहेत. अशा बिकट स्थितीचा सामना करणाºया मानवजातीसह भूतलावरील जीवजंतूंच्या रक्षणासाठी सर्वत्र पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव, अशी मागणी नमाजपठाणातून करीत आहे.

लष्करी अळीबाबत जनजागृती मोहीमनिफाड : तालुका कृषी विभागाच्या वतीने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी निफाड तालुक्यातील बेहेड येथे शेतकºयांसाठी मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरात मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील यांनी मका पिकांची पेरणीपूर्वी बीजप्रक्रि या करण्यासाठी थायोमेथोक्झाम व सायएन्ट्रीनिलीपोल ही संयुक्त कीटकनाशके चार मिली प्रति एक किलो बियाणेसाठी वापरून पेरणी करावी, असे सांगितले.