दारू पिण्यासाठी उद्यानाचे दरवाजा न उघडल्याने एकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:09 IST2018-11-25T17:08:34+5:302018-11-25T17:09:04+5:30
नाशिक : दारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याने तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड मुक्तिधामसमोरील सोमानी उद्यानात घडली आहे़

दारू पिण्यासाठी उद्यानाचे दरवाजा न उघडल्याने एकास जबर मारहाण
नाशिक : दारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याने तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड मुक्तिधामसमोरील सोमानी उद्यानात घडली आहे़
राजेंद्र पाठक (रा़ इच्छामणीनगर, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उद्यानातील खेळण्यांचा ठेका असलेल्या इसमाकडे ते कामास असल्याने उद्यानाचे प्रवेशद्वार उघडणे वा बंद करण्याचे काम ते करतात़ शुक्रवारी (दि़२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यानाचे गेट बंद केले़ यावेळी तिथे आलेले संशयित निखिल (रा़ भालेराव मळा), हर्षद (रा़ सुभाषरोड) व ओम (रा़ भालेराव मळा) यांनी दारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याच्या कारणावरून या तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली़ यामध्ये पाठक यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे़
या प्रकरणी उपनगर पोलिसांनी या तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़