करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:36 IST2018-12-06T17:36:32+5:302018-12-06T17:36:48+5:30
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा खावी लागली आहे.

करार पूर्तता न केल्याने ऊसतोड कामगार कंत्राटदारास अटक
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडून रोख उचल घेऊन ऊसतोड कामगार पुरवठा न करणाऱ्या ऊसतोड कंत्राटदारांविरु द्ध कारखान्याने वसुली दावे दाखल केले आहे, मात्र सदर दाव्यांना न्यायालयात अनेक वेळा समन्स बजावुनही हजर न राहणाºया एका कंत्राटदारास जेलची हवा खावी लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की छगन दामू चव्हाण रा. अंधेरी ता. चाळीसगाव या ऊसतोड कंत्राटदाराने कादवा सहकारी साखर कारखान्याकडून उचल घेत ऊसतोड कामगार पुरवण्याचा करार केला होता. मात्र त्याने कराराची पूर्तता केली नाही, व दिलेला धनादेश वटला नाही त्यामुळे कादवाने सदर कंत्राटदाराविरुध्द एक लाख सत्तावन्न हजार तीनशे रु पये वसुलीचा दावा दिंडोरी न्यायालयात दाखल केलेला होता. सदर कंत्राटदार अनेक वेळा समन्स बजावुनही हजर होत नव्हता अखेर तो दि.१५ नोव्हेंबरला न्यायालयात हजर झाला असता त्यास न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यास अटक करत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. या कारवाईमुळे थकीत कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.