बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने भोपळा फेकला बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:00 IST2020-07-20T21:41:46+5:302020-07-21T02:00:50+5:30
कवडदरा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर येथील शेतकऱ्यांवर काशीफळ भोपळा पिकवल्यानंतर तो बांधावर फेकण्याची वेळ आली. या पीकाच्या विक्रीसाठी लागणाºया वाशी, आग्रा व हैद्राबाद बाजारपेठेसाठी सुरु असलेली वाहतूक बंद झाल्याने ही वेळ आल्याचे भोपळा उपादक शेतकºयात बोलले जात आहे.

बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने भोपळा फेकला बांधावर
कवडदरा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर येथील शेतकऱ्यांवर काशीफळ भोपळा पिकवल्यानंतर तो बांधावर फेकण्याची वेळ आली. या पीकाच्या विक्रीसाठी लागणाºया वाशी, आग्रा व हैद्राबाद बाजारपेठेसाठी सुरु असलेली वाहतूक बंद झाल्याने ही वेळ आल्याचे भोपळा उपादक शेतकºयात बोलले जात आहे.
भोपळ्याला इतरत्र विशेष मागणी नाही व योग्य दरही मिळत नसल्याने कवडदरा, साकूर, पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेला भोपळा बांधावर टाकून दिला आहे. येथील तरूण शेतकरी किरण सहाणे यांनी एप्रिल-मे महिन्यात सेंच्युरी जातीच्या काशीफळ भोपळा (डांगर) ची लागवड केली होती. यासाठी त्यांनी लागवड करावयाच्या क्षेत्राची मशागत करून शेणखत टाकले. सरी काढून त्यामध्ये सहा बाय तीन फूट अंतरावर ठिबक सिंचनाद्वारे लागवड केली. पासष्ट दिवसात येणाºया या पिकास विविध सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांची मात्राही दिली. वेळोवेळी बुरशी व किटकनाशकांच्या फवारण्या केल्या. यामुळे पिक जोमदार आले. पण सध्या अनेक बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले आहेत. परिणामी झालेला खर्च ही निघाला नाही. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या भोपळ्याला मागणी नाही. त्यामुळे शेतकºयांनी काशीफळ भोपळा बांधावर टाकून दिला
आहे.
भोपळा पिकविल्यानंतर त्यास बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने तो बांधावर फेकून देण्याची वेळ आली़ कृषी विभागाने संबंधित काशीफळ भोपळा उत्पादक शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.
- किरण सहाणे, भोपळा उत्पादक शेतकरी, साकूर