मांगबारी-खामखेडा रस्त्याची दुरवस्था

By Admin | Updated: January 20, 2016 22:11 IST2016-01-20T22:10:12+5:302016-01-20T22:11:19+5:30

संताप : काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी

Due to Mangbari-Khamkheda Road | मांगबारी-खामखेडा रस्त्याची दुरवस्था

मांगबारी-खामखेडा रस्त्याची दुरवस्था

खामखेडा : साक्री-नामपूर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा-कळवण-नाशिक ह्या राज्य महामार्ग क्रमांक १७ वरील मांगबारी-खामखेडा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील ठिकठिकाणी डांबर उखडल्याने चाळण झाली आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मांगबारी घाटाच्या पायथ्यापासून सुळे डावा कालवा जातो. या कालव्यासाठी महामार्गावर भूमिगत फरशी लावण्यात आली आहे. मात्र फरशी पूल झाल्यानंतर या रस्त्यावरील फरशीच्या दोन्ही बाजूंना खडीकरण करून डांबरीकरण करणे आवश्यक होते.
परंतु दोन्ही बाजूंना खडी व माती, मुरुम टाकल्याने घाटावरून येणारी वाहने उतार असल्यामुळे भरधाव असतात. या कच्च्या रस्त्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळ होऊन आपघात होतात. काही महिन्यांपूर्वी मांगबारी ते खामखेडा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती.
मात्र, सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तीन-चार महिन्यात रस्त्या पुन्हा उखडला. आजपर्यंत अनेकवेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. पण खामखेडा ते
मांगबारी रस्त्याचे काम नावापुरते केले जाते.
नाशिक व नांदुरीगडावर जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने साक्री, नंदुरबार, नवापूर आदि भागातील भाविकांची नेहमी वर्दळ असते. तसेच नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या कामगारांचीही संख्या मोठ्या असते. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक, यात्रेकरूंसह खामखेडा, पिळकोस, बेज परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत
आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to Mangbari-Khamkheda Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.