नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना साधे पणाने केली आहे, तर काही ठिकाणी महापालिकेने नियमांचे पालन होत नसल्याने दोनशेहून अधिक मंडळांच्या अर्जांवर फुली मारली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे.गणेशोत्सव यंदा साधे पणाने करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांनीदेखील त्याची दखल घेऊनच उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शनिवारी (दि. २२) मानाच्या महापालिकेच्या गणपतीची अत्यंत साधेपणाने मेनरोडवर स्थापना करण्यात आली.रविवार कारंजा मंडळाने चांदीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात श्री गणरायाच्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तर गुलालवाडी आणि अन्य मंडळांनीदेखील पारंपरिक पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. भद्रकाली परिसरातील चार मंडळांनी एकत्र येऊन भद्रकालीच्या राजाची प्रतिष्ठापना केली आहे. तर बीडी भालेकर मैदानात देखील सात मंडळांनी एकत्र येऊन एकच गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे. अशाप्रकारे अनेक मंडळांनी आपल्या भागातच अन्य मंडळांच्या बरोबर एकत्रित उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने यंदा मंडळांची संख्या घटली आहे.ाहापालिकेकडे यंदा ३६८ मंडळांनी अर्ज केले होते. यातील २१२ मंडळांना महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यंदा नाशिक पूर्व मध्ये १६, पश्चिममध्ये २२, सिडकोत १६, पंचवटीत ३८, सातपूर विभागात अकरा आणि नाशिकरोड विभागात पंधरा मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर पूर्वत ३५, पश्चिममध्ये ३९, सिडकोत ५१, पंचवटीत ४३, सातपूर येथे ११ तर नाशिकरोड येथे ३३मंडळांची परवानगी नाकारण्यात आली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये महापालिकेकडे साडेचारशे मंडळांनी अर्ज केले होते. तर २०१८ मध्ये ६३७ मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली होती. गेल्या वर्षी ५८४ मंडळांना महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली होती.ं
एकत्रित गणेशोत्सवामुळे घटली मंडळांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:45 IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना साधे पणाने केली आहे, तर काही ठिकाणी महापालिकेने नियमांचे पालन होत नसल्याने दोनशेहून अधिक मंडळांच्या अर्जांवर फुली मारली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे.
एकत्रित गणेशोत्सवामुळे घटली मंडळांची संख्या
ठळक मुद्देनियमांचे पालन । मनपाने नाकारली दोनशे मंडळांना परवानगी