शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

सेनेच्या कार्यकारिणीमुळे खदखद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:56 AM

नाशिक : शिवसेनेची प्रलंबित कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, मध्य नाशिक मतदारसंघातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तथापि, यात प्रभाग तेरा मध्येच मोठ्या प्रमाणात पदे देण्यात आली असून, त्यात गटबाजीचे प्रतिबिंब उमटल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.  नाशिक महानगर प्रमुखपदाचे दोन भाग केल्यानंतरअद्यापही कार्यकारिणी घोषित करण्यात ...

नाशिक : शिवसेनेची प्रलंबित कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, मध्य नाशिक मतदारसंघातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तथापि, यात प्रभाग तेरा मध्येच मोठ्या प्रमाणात पदे देण्यात आली असून, त्यात गटबाजीचे प्रतिबिंब उमटल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.  नाशिक महानगर प्रमुखपदाचे दोन भाग केल्यानंतरअद्यापही कार्यकारिणी घोषित करण्यात आली नव्हती. त्यासाठी पक्षाचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर ही कार्यकारिणी मुंबईला वरिष्ठांच्या संमतीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते त्याला अखेरीस मुहूर्त लागला असून, शिवसेनेच्या मुखपत्रात मंगळवारी (दि.२६) कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक मध्य उपमहानगर प्रमुख म्हणून राजाभाऊ क्षीरसागर, शरद देवरे, वैभव खैरे, संतोष ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संघटक म्हणून अनिल साळुंखे, कमलेश परदेशी, रवींद्र जाधव आणि वीरेंद्रसिंग टिळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यालयीन उपमहानगरप्रमुख म्हणून सचिन बांडे, अजय चौघुले, दत्ता दंडगव्हाण आणि शशिकांत कोठुळे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मध्य विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि चाळीस शाखा प्रमुख घोषित करण्यात आले आहेत. पक्षातील विरोधकांनी या कार्यकारिणीवर टीका केली असून, सर्वाधिक पदे प्रभाग १३ मध्ये देण्यात आली आहेत. मात्र महत्त्वाचे विधान सभा अध्यक्षपद जाणीवपूर्वक भरले नसल्याचा आरोप करण्यात येत आहेत. पक्षातील कार्यापेक्षा व्यक्तिगत संबंधांना स्थान देण्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अनेक पदे इतरत्र पसरविण्यात आली असून प्रभाग १३ मधील चिल्लर फेम उमेदवार प्रमोद नाथेकर यांना प्रभाग ३० साठी विभाग प्रमुख नेमल्यानेदेखील नाराज गटाने आश्चर्य व्यक्त केले आहे.अत्यंत उत्तम कार्यकारिणीशिवसेनेच्या इतिहासात अशाप्रकारची सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांचे कार्य जाणून घेऊन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. दोन पदे केवळ कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींना सांगून मुद्दामहून वाढवून घेण्यात आली आहेत. आधी पक्षातील सर्वांची कामे जाणून घेऊन त्यानुसार त्यांना कार्यकारिणीत कुठे तरी संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. पक्षात केवळ जुन्यांनाच संधी दिली अशातला भाग नाही तर नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत संगम करण्यात आला आहे. शक्य त्यांना पक्षाने संधी दिली असून सर्वांना न्याय देणारी कार्यकारिणी म्हणून कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. आजवर शाखा प्रमुखांची अशाप्रकारे नियुक्ती झाली नव्हती, मात्र प्रभाग रचना बघता तेथही प्रभागाच्या तुलनेत शाखा प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेला बळकटी देणारी ही कार्यकारिणी आहे. - सचिन मराठे, महानगरप्रमुखमिर्लेकर अंधारातपक्षाचे उत्तर महाराष्टचे नेते रवींद्र मिर्लेकर यांना दाखवलेली यादी वेगळीच होती आणि नंतर त्यात बदल करण्यात आले असाही आरोप नाराज गटाकडून करण्यात येत आहेत. शाखा प्रमुख नेमण्याआधी शाखा तपासाव्यात, अशी मागणीदेखील या गटाने केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिक