वळण बंधाऱ्यामुळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:29 IST2020-09-07T23:14:32+5:302020-09-08T01:29:22+5:30
पेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे.

वळण बंधाऱ्यामुळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत घटला
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे.
पेठ तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या पाश्चिम वाहीणी आहेत. लघू पाटबंधारे बांधकाम विभाग अंतर्गत 9 लहान मोठे प्रकल्प असून त्यामध्ये लिंगवणे, आड बु., हरणगाव, शिंदे, चोळमूख, श्रीमंत(गावंधपाडा) पाहूचीबारी, इनामबारी, शिराळे आदींचा समावेश आहे.पैकी ऑगष्ट अखेर लिंगवणे, शिंदे, चोळमूख, पाहूचीबारी, इनामबारी व शिराळे हे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत.
वळण योजनेचा झाला परिणाम ...
गुजरात राज्याकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते पूर्ववाहिनी नद्याद्वारे दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरणात वळवण्यासाठी पेठ व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर घाटाच्या वर वळण योजना राबवण्यात आली. यामूळे घाटमाथ्यावरून खाली वाहणारे पाणी अडवले गेले. याच पाण्यावर दरवर्षी वाघाड धरणाचा जलसाठा वाढत असतो. मात्र या वळण योजनेमुळे आड बु., हरणगाव, श्रीमंत, या धरणाच्या जलसाठयात घट निर्माण झाली आहे. या वर्षी पर्जन्यमानातही मोठया प्रमाणावर घट झाली असून सप्टेबर महिना सुरु झाला तरी सरासरी गाठली नसल्याने संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. ऑगष्ट अखेर 1464 मिमी पाऊस पडला आहे.
पेठ तालुक्यातील धरणांचा एकूण जलसाठा ( कंसात सद्याचा जलसाठा)
आकडे द.ल.घ. फू. मध्ये
1) लिंगवणे -65.62(65.62)
2) आड-58.21(33.52)
3)हरणगाव -181.40(144.37)
4) शिंदे -43.04(43.04)
5) चोळमूख -140.27(140.27)
6) श्रीमंत(गावंधपाडा) -399.12(256.84)
7) पाहूचीबारी -55.39(55.39)
8) इनामबारी -87.14(87.14)
9) शिराळे -67.03(67.03)