शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नांदगावी मालगाडीची कपलिंग तुटल्याने धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 2:35 PM

नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या ५२ डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची गुरूवारी सकाळी चांगलीच धावपळ उडाली. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या १२ डब्यासह उरलेले मागेच राहिले.

नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या ५२ डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची गुरूवारी सकाळी चांगलीच धावपळ उडाली. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या १२ डब्यासह उरलेले मागेच राहिले. दीड तास दुरु स्तीला लागल्याने मालगाडीच्या मागे असलेल्या डाऊन लाईनच्या (भुसावळकडे) लांब पल्याच्या अनेक प्रवासी गाड्या ठिकठिकाणी थांबून राहिल्या. मात्र डब्यांमध्ये ज्वलनशील इंधन असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात निभावले. पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम प्रकल्पातून निघालेली ५२ डब्यांची मालगाडी, सकाळी सुमारे १०.२० वा. नांदगावच्या अलीकडे इदगाह स्थानाच्या दरम्यान ४० व्या डब्याची कपलिंग अचानक खळळ खट्याक आवाज करत तुटल्याने थांबली. तलाडी (जिल्हा चन्द्रपूर) कडे जाणाºया या मालगाडीत एचएसडी (युरो ४) (हायस्पीड डिझेल) इंधन भरलेले होते. कपलिंग तुटल्याने ४० डब्बे व इंजिन पुढे निघून गेले तर गार्डच्या १२ डब्यासह उरलेले मागेच राहिले. दरम्यान ब्रेक्सची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने इंजिनला जोडलेले डब्बे व अलग झालेले डब्बे जागच्या जागीच थांबून गेले. गाडी वेगात असती व डब्बे रु ळावरून खाली घसरले असते तर पुढच्या अनर्थाची कल्पनाच केलेली बरी. अशी चर्चा अपघात स्थळी सुरु होती. गाडीच्या एकेका डब्यामध्ये सुमारे ६५ ते ७० हजार लिटर एचएसडी (युरो ४) हे इंधन असल्याची लेबल्स लावण्यात आली होती.

टॅग्स :Nashikनाशिक